येरवडा : भक्ती, परंपरा आणि आनंदाचा सण; बलिप्रतिपदेचं औचित्य साजरं
येरवडा : भक्ती, परंपराडा : बलिप्रतिपदा म्हणजे भक्ती, प्रेम आणि परंपरेचं प्रतीक आहे. या दिवशी राजा बळीच्या आठवणींनी आपल्या संस्कृतीचा गौरव उजळतो. व्यापारी वर्गासाठी हा दिवस नववर्षाची सुरुवात मानला जातो, तर शेतकरी सर्जा-राजाचे पूजन करून कृतज्ञतेचा सण साजरा करतात.

विक्रम संवताच्या नव्या वर्षाचे स्वागत आनंद, उत्साह आणि आशावादाच्या वातावरणात करण्यात आले. पारंपरिक पद्धतीने पूजन, देव-देवतांना नैवेद्य, तसेच कुटुंबीयांमध्ये गोडधोडाचा प्रसाद वाटून शुभेच्छा देण्यात आल्या.
येरवड्यातही विविध ठिकाणी बलिप्रतिपदेच्या कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सामाजिक संघटना आणि स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन परंपरेला उजाळा दिला.
“बलिप्रतिपदा म्हणजे भक्ती, प्रेम आणि परंपरेचं प्रतीक. विक्रम संवताच्या नव्या वर्षात प्रत्येकाच्या आयुष्यात यश, आरोग्य आणि आनंद लाभो,” अशा शब्दांत माजी नगरसेवक संतोष आरडे यांनी नागरिकांना बलिप्रतिपदा आणि पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.