पुण्यात ‘गुलाबी’ टीमसोबत महिलांची भव्य बाईक रॅली – व्हिडिओ

0

पुणे, १३ नोव्हेंबर – पुण्यात नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या दुचाकी रॅलीत महिलांनी ‘गुलाबी’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. या रॅलीत गुलाबी रंगाच्या पारंपरिक पोशाखात सजलेल्या महिलांनी सहभाग घेत चित्रपटाच्या थीमला अधोरेखित केले. रॅलीला ‘गुलाबी’ चित्रपटातील प्रमुख अभिनेत्री श्रुती मराठेने देखील उपस्थिती लावून रंगत आणली.

रॅलीची सुरुवात कोथरूड येथील शिवाजी महाराज पुतळा येथून झाली. महिलांनी करिष्मा चौक, सीडीएसएस चौक, डीपी रोड मार्गे शुभारंभ लॉन्सपर्यंत दुचाकीवरून प्रवास केला. गुलाबी फेटे घालून सजलेल्या महिलांच्या या रॅलीमुळे पुण्याचे रस्ते गुलाबी रंगात न्हालले.

पहा व्हिडिओ

यानंतर ‘गुलाबी Live’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये चित्रपटातील सर्व कलाकारांची उपस्थिती होती. मंदार बलकवडे यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात संगीत मैफलीचे सादरीकरण करण्यात आले. अभिनेत्री श्रुती मराठे, मृणाल कुलकर्णी, सुहास जोशी यांच्यासह कलाकारांनी प्रेक्षकांशी संवाद साधला आणि चित्रपटातील गाण्यांचे सादरीकरण केले.

‘गुलाबी’ हा चित्रपट तीन मैत्रिणींच्या जीवनातील संघर्ष, स्वप्न आणि आत्मसन्मानाच्या शोधाचा प्रवास दाखवतो. या चित्रपटाचे दिग्दर्शक अभ्यंग कुवळेकर यांनी सांगितले की, “चित्रपट केवळ मैत्रीवरच नाही, तर महिलांच्या वैयक्तिक संघर्षांवर आधारित आहे. आम्ही या चित्रपटातून प्रेक्षकांना एक सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.”

चित्रपटाचे निर्माते सोनाली शिवणीकर, शीतल शानभाग, अभ्यंग कुवळेकर आणि स्वप्नील भामरे यांनी ‘व्हायोलेट फ्लेम मोशन पिक्चर्स’च्या बॅनरखाली हा चित्रपट सादर केला आहे. या चित्रपटात श्रुती मराठे, मृणाल कुलकर्णी, अश्विनी भावे, ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी, शैलेश दातार, निखिल आर्या यांच्यासह अनेक कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.

संगीतकार साई-पियुष यांनी दिलेल्या संगीताच्या साथीने ‘गुलाबी’ चित्रपट २२ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *