खासगी कर्मचाऱ्यांचे कामाचे तास वाढणार? सरकारचा मोठा निर्णय लवकरच

0
Mahakamgar-2.jpg

मुंबई : राज्यातील खासगी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. दुकाने, हॉटेल्स, मॉल्स आणि इतर खासगी आस्थापनांमधील कामाचे तास वाढवण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. सध्या ९ तासांची मर्यादा असलेले कामाचे तास १० तास करण्याचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळासमोर आला आहे.

मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत कामगार विभागाने या संदर्भात सविस्तर माहिती दिली. मात्र काही तरतुदींवर अधिक स्पष्टीकरण आवश्यक असल्याने हा निर्णय सध्या स्थगित ठेवण्यात आला आहे. प्रस्तावावर अंतिम निर्णय लवकरच घेण्यात येणार आहे.

प्रस्तावातील महत्त्वाचे बदल असे :

कामाचे तास: प्रौढ कामगाराला दिवसाला १० तासांपेक्षा जास्त काम करण्यास भाग पाडले जाणार नाही. (सध्या मर्यादा ९ तास)

सलग कामाचा कालावधी: सध्या ५ तासांनंतर अर्धा तास विश्रांती बंधनकारक आहे; प्रस्तावानुसार ही विश्रांती ६ तासांनंतर लागू होईल.

ओव्हरटाईम: तीन महिन्यांतील ओव्हरटाईम १२५ तासांवरून १४४ तासांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव.

कमाल मर्यादा: दिवसातील कमाल कामाचे तास (ओव्हरटाईमसह) १०.५ वरून १२ तास करण्याची तयारी.

तातडीच्या कामासाठी: १२ तासांची कमाल मर्यादा रद्द करून गरजेप्रमाणे अधिक काम घेण्याचा प्रस्ताव.

कायद्याची व्याप्ती: सध्या कायदा १० किंवा अधिक कर्मचाऱ्यांच्या आस्थापनांवर लागू आहे. नव्या दुरुस्तीनुसार तो २० किंवा अधिक कर्मचाऱ्यांवर लागू होणार.


कामगार विभाग २०१७ मधील “महाराष्ट्र दुकाने व आस्थापने (रोजगार नियमन व सेवा अटी) अधिनियम” मध्ये एकूण पाच महत्त्वाचे बदल करण्याच्या तयारीत आहे. त्यातील कामाचे तास वाढवणे हा सर्वाधिक चर्चेचा मुद्दा ठरत आहे.


Spread the love

Leave a Reply