न्यू मोदीखाना परिसराचा पाणीप्रश्न सुटला: नागरिकांचा दिलासा

पुणे : पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड परिसरातील वार्ड क्रमांक ४ न्यू मोदीखाना येथील नागरिकांना दीर्घकाळ भेडसावत असलेला अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी स्थानिक नेते आणि प्रशासनाच्या प्रयत्नांना यश आले.
प्रश्न सोडवण्यासाठी मा. आमदार सुनील भाऊ कांबळे, मा. नगरसेवक विवेक भाऊ यादव तसेच संतोष भाऊ यादव, नितीन भुरेवार, सौरभ राऊत आणि रणवीर आरगडे यांनी पुढाकार घेतला. स्थानिक महिला मंडळ, पुणे कॅन्टोन्मेंट लष्कर पाणीपुरवठा विभाग आणि त्यांच्या मित्रपरिवाराने संयुक्तपणे शोधकार्य व नियोजन करून हा प्रश्न सोडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.



प्रशासनाने तातडीने पाणीपुरवठ्याच्या समस्या ओळखून योग्य उपाययोजना केल्या. यामुळे आता या परिसरातील नागरिकांना नियमित व पुरेशा प्रमाणात पाणी मिळू लागले आहे. नागरिकांनी समाधान व्यक्त करत या सर्व मान्यवरांचे आभार मानले आहेत.
या यशस्वी प्रयत्नांमुळे पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डच्या अन्य समस्यांवर देखील तत्परतेने कार्यवाही होईल, अशी अपेक्षा स्थानिकांनी व्यक्त केली आहे.