विमाननगरची मध्यरात्रीची ‘दहशत पाळी’ सुरूच?
कोणार्क नगरात तरुणांचा गोंधळ, पोलीस यंत्रणा अजूनही गाढ झोपेत! व्हिडिओ

0
IMG_20251213_120234.jpg

पुणे : विमाननगरमधील कोणार्क नगर परिसरात काल मध्यरात्री काही तरुणांनी रस्त्यावरच ‘मनोरंजनाचा’ कार्यक्रम सादर करत आपसात भांडण, शिवीगाळ आणि दहशत माजवली. रात्रीची शांतता भंग करत या तरुणांनी नागरिकांना अक्षरशः जागरण घडवले. विशेष म्हणजे, हा काही पहिलाच प्रकार नसून विमाननगरमध्ये असे ‘मध्यरात्रीचे उद्योग’ सातत्याने घडत असल्याची खंत स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.

पहा व्हिडिओ

रात्री उशिरा रस्त्यावर आरडाओरड, शिवीगाळ, हातघाई आणि दहशतीचे वातावरण निर्माण करणे हे जणू विमाननगरचे नवे नाईट लाइफ आकर्षण बनले आहे की काय, असा सवाल नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. परिसरातील कुटुंबे, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न दिवसेंदिवस ऐरणीवर येत असताना पोलीस प्रशासन मात्र ‘घटनांची वाट पाहत’ असल्याचे चित्र दिसते.

“काही घडले तरच कारवाई” अशी धोरणे अमलात आणली जात आहेत का, असा टोमणा स्थानिकांकडून लगावला जात आहे. रात्रीच्या गस्त वाढवणे, संशयित तरुणांवर वेळीच कारवाई करणे आणि परिसरात दहशत निर्माण करणाऱ्यांना वठणीवर आणणे, ही जबाबदारी नेमकी कुणाची? असा सवाल उपस्थित होत आहे.

विमाननगरमध्ये कायद्याची भीती संपली की पोलीस यंत्रणा केवळ कागदावरच सक्रिय आहे? असे चित्र राहिले तर उद्या आणखी गंभीर घटना घडण्याची वाट पाहावी लागणार का, असा संतप्त प्रश्न स्थानिक नागरिक विचारत आहेत. पोलीस प्रशासनाने या घटनांकडे गांभीर्याने लक्ष देऊन ठोस कारवाई करावी, अशी जोरदार मागणी आता नागरिकांकडून होत आहे.

Spread the love

Leave a Reply

You may have missed