पुण्यातील खराडी परिसरात पत्नीची हत्या करत व्हिडिओ शूट करणाऱ्या पतीचा थरारक गुन्हा उघडकीस – व्हिडिओ

n6488349351737699639140c92c91f2cbaf461e708d5c16188674acc57163d88d940330e879e1bfcaff1d72.jpg

पत्नीच्या हत्या प्रकरणाने पुणे हादरलंः पतीने शिलाई मशीनच्या कात्रीने केली हत्या, मुलासमोर भीषण कृत्य

पुणेः पुण्यातील खराडी परिसरात घडलेल्या एका भीषण घटनेने शहर हादरून गेलं आहे. कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (२२ जानेवारी) पहाटे उघडकीस आली. मूळचा बीडचा असलेला शिवदास गीते (४०) याने राहत्या घरात पत्नी ज्योती गीते हिचा शिलाई मशीनच्या कात्रीने गळा चिरून खून केला.

हा भयंकर प्रकार त्यांच्या लहानग्या मुलासमोर घडला. हत्या केल्यानंतर शिवदासने मृत पत्नीचा मोबाइलवर व्हिडिओ शूट केला. या व्हिडिओमध्ये त्याने वारंवार पत्नीवर त्याला मारण्याचा कट रचल्याचा आरोप केला. “तू मला मारायचा प्लान करत होतीस, पण मला पर्याय उरला नाही,” असे तो म्हणत होता.

पहा व्हिडिओ

घटनेचा तपशील:

खराडीतील तुळजाभवानीनगर परिसरात भाड्याच्या घरात राहणाऱ्या गीते कुटुंबात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते. बुधवारी पहाटे या वादाला टोक आलं आणि रागाच्या भरात शिवदासने पत्नीवर हल्ला केला. हल्ल्यामुळे खोलीभर रक्त सांडलं. शेजाऱ्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ज्योतीला ससून रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

पोलिसांनी घेतली आरोपीची चौकशीः

पोलिसांनी शिवदास गीते याला तातडीने अटक केली आहे. चौकशीदरम्यान त्याने कौटुंबिक तणावामुळे हा प्रकार घडल्याचा कबुलीजबाब दिला. त्याने व्हिडिओत म्हटलं की, “मी स्वतःच्या रक्षणासाठी हिला मारलं. तिच्या माहेरच्या लोकांनीही मला संपवण्याचा प्रयत्न केला. ती घरकामाच्या नावाखाली माझ्या हत्या करण्याचा कट रचत होती.”

कौटुंबिक वादाचे टोकः

शिवदास गीते न्यायालयात टंकलेखक म्हणून कार्यरत होता. पत्नी ज्योतीसोबतचे नाते ताणले गेले होते. त्यांचा वाद इतका विकोपाला गेला की, यामुळे एक निरागस बालक मातृ-पित्याविना भविष्याकडे पाहत आहे.

पुढील तपास सुरूः

या हत्येमागील अधिक स्पष्ट कारण समजण्यासाठी पोलिस अधिक तपास करत आहेत. या घटनेने खराडी परिसरात खळबळ उडाली असून समाजमनाला हादरा दिला आहे.

Spread the love

You may have missed