तीन कोटी खर्चूनही उपचार निष्फळ; आई बरी न झाल्याने मुलाची पोलिसांकडे धाव

n68281095817589490993404de5705f486e64a8c657eb71f61607668e265d039d73f872d3f487e3d1be53fd.jpg

नवी मुंबई : तब्बल तीन कोटी रुपये खर्चूनही आईची प्रकृती सुधारली नाही, म्हणून एका मुलाने थेट पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणामुळे उपचार खरंच वैद्यकीय होते की मंत्र-तंत्राच्या आधारे, याबाबत शंका निर्माण झाली आहे.

नेरूळमध्ये राहणाऱ्या महिलेची प्रकृती २०१९ पासून बिघडत होती. तपासणीत आजाराचे लक्षण दिसून आल्यानंतर कुटुंबीयांनी विविध मार्गाने उपचार सुरू केले. त्याच काळात पालघरमध्ये राहणाऱ्या काही व्यक्तींनी महिलेला पूर्णपणे बरे करण्याची हमी दिली. त्यानुसार २०१९ पासून सातत्याने उपचार सुरू झाले. मात्र, पाच वर्ष उलटल्यानंतरही प्रकृतीत कोणताही फरक पडला नाही.

दरम्यान, या उपचारांवर तब्बल तीन कोटी रुपये खर्च झाले. यामुळे अखेर मुलाने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

उपचार खरंच वैद्यकीय की खोटे?
या प्रकारानंतर पोलिसांपुढे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. महिलेवर झालेले उपचार औषधोपचार होते की काही वेगळ्या पद्धतीचे, हे अजून स्पष्ट नाही. तक्रारदाराने संबंधितांनी धमक्या दिल्याचाही आरोप केला आहे. त्यामुळे फसवणूक, धमकी आणि बेकायदेशीर उपचार अशा सर्व बाजू पोलिसांना तपासाव्या लागणार आहेत.

तज्ज्ञांच्या मते, उपचार करूनही लाभ न झाल्याने फसवणुकीचा गुन्हा दाखल होणे हा दुर्मीळ प्रकार असून, पोलिसांना तपासासाठी अनोख्या पद्धतीचा अभ्यास करावा लागणार आहे.


Spread the love