पुणे कॅम्पमध्ये वीर गोगादेव उत्सवामुळे वाहतुकीत बदल, वाचा सविस्तर

पुणे: वीर गोगादेव उत्सवानिमित्त, सोमवारी (दि. 26) पुणे कॅम्प येथील न्यू मोदीखाना परिसरातून मुख्य मिरवणूक निघणार आहे. संध्याकाळी चार वाजता सुरू होणाऱ्या या मिरवणुकीत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होतील. मिरवणुकीदरम्यान वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि वाहनचालकांची गैरसोय होऊ नये म्हणून परिसरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत.
मुख्य मिरवणुकीचा मार्ग असा असेल: न्यू मोदीखाना येथून मिरवणूक सुरू होऊन पुलगेट पोलीस चौकी, मेढी माता मंदिर, महात्मा गांधी रोड, कुरेशी मस्जिद, सेंटर स्ट्रीट, भोपळे चौक, महावीर चौक, आणि कोहिनूर हॉटेल चौक मार्गे पुलगेट पोलीस चौकी, मेढी माता मंदिर येथे विसर्जन होईल.
मिरवणूक सुरू झाल्यानंतर बंद होणारे मार्ग आणि पर्यायी मार्ग: गोळीबार मैदान चौकातून वाय जंक्शन (पंडोल अपार्टमेंट) महात्मा गांधी रोडकडे येणारी वाहतूक वाय जंक्शन येथे बंद करून खाणे मारुती चौकात वळवली जाईल. सोलापूर रोडला जाणारी वाहतूक खाणे मारुती चौकातून उजवीकडे वळून शहरात येईल. इंदिरा गांधी चौक, महावीर चौक, एम जी रोड आणि तीन तोफा चौक यांमार्गे वाहतूक सोडण्यात येईल.
कुरेशी मस्जिदकडे जाणारी वाहतूक चुडामन तालिमकडे वळवली जाईल, तर व्होल्गा चौकाकडून महमंद रफी चौकाकडे जाणारी वाहतूक ईस्ट स्ट्रिटने इंदिरा गांधी चौकात वळवली जाईल. महावीर चौकातून सरबतवाला चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करून एम जी रोडने नाझ चौकाकडे वळवली जाईल.
शिवाजी मार्केट, सेंटर स्ट्रीट चौकी, कोळसा गल्ली आणि एम जी रोडकडे जाणारी वाहतूक परिस्थितीनुसार नियंत्रित केली जाईल.
या वाहतूक बदलांची अंमलबजावणी सोमवारी संध्याकाळी चार वाजता मिरवणूक संपेपर्यंत करण्यात येईल.