आज अर्ज माघारीचा शेवटचा दिवस; दुपारी 3 नंतर निवडणुकीतील चित्र स्पष्ट होणार

0

पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज (सोमवार, 4 ऑक्टोबर) दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. ऐन दिवाळीत बंडखोर उमेदवारांना माघारी घेण्यासाठी सर्व राजकीय पक्षांतील नेते रविवारी दिवसभर प्रयत्न करत होते. दुपारी 3 नंतरच राज्यातील लढतींचा अंतिम आकार स्पष्ट होईल.

महाविकास आघाडी आणि महायुती यांना पक्षांतर्गत बंडखोरांची चिंता भेडसावत आहे. या निवडणुकीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची संख्या 7066 असून, त्यात बंडखोरांची संख्या लक्षणीय आहे. प्रत्येकाला संधी न देता आल्याने इच्छुकांनी बंडाचे हत्यार उपसले आहे. त्यामुळे आघाडी व युतीतील प्रमुख पक्षांमध्ये खरी लढत पाहायला मिळणार आहे.

माहीम मतदारसंघात ठाकरे विरुद्ध सरवणकर

राज्यातील चर्चेत असलेल्या माहीम मतदारसंघातून मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्यासमोर महायुतीचे उमेदवार सदा सरवणकर उभे असून, सरवणकर यांनी निवडणुकीसाठी ठाम भूमिका घेतली आहे. भाजपने अमित ठाकरे यांना पाठिंबा दिला असला, तरी सरवणकर काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बोरिवलीत भाजपला बंडखोरीचा फटका?

बोरिवली मतदारसंघात भाजपच्या अधिकृत उमेदवार संजय उपाध्याय यांच्या विरोधात माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी शेट्टींची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा निर्णय अद्याप स्पष्ट नाही. शेट्टी जर निवडणूक लढवली, तर भाजप उमेदवाराला फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज शेट्टी काय भूमिका घेतात, हे भाजपसाठी निर्णायक ठरेल.

राजकीय रंगत वाढणार

288 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत अर्ज माघारी घेण्याची आजची अंतिम मुदत संपल्यावर राजकीय रंगत वाढण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या बंडखोरांचा निर्णय पक्षांच्या निवडणूक रणनीतींवर प्रभाव टाकणार असल्याने आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed