प्रेमाचं आमिष दाखवून तीन कर्मचाऱ्यांची फसवणूक; महिला कंडक्टर हनीट्रॅप प्रकरणात अटक

0
hansyce-troals8_2025071505980.jpg

पुणे : पीएमपीएमएलच्या पुणे स्टेशन आगारात घडलेल्या हनीट्रॅप प्रकरणाने शहरात खळबळ उडाली आहे. पैशासाठी प्रेमाचं आमिष दाखवत तिन्ही कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध ठेवून त्यांना ब्लॅकमेल करणाऱ्या महिला कंडक्टरला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

सदर महिला वारंवार संबंधित कर्मचाऱ्यांना बलात्काराच्या खोट्या तक्रारीची धमकी देत त्यांच्याकडून रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू उकळत होती. या प्रकरणाची तक्रार 17 सप्टेंबर रोजी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली.

तपासादरम्यान पोलिसांना समजले की, आरोपी महिला कंडक्टरने तीन वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांना प्रेमसंबंधात ओढले आणि नंतर भावनिक व मानसिक दबाव आणून पैसे उकळले. एवढंच नव्हे तर काही पीडितांविरोधात तिने खोट्या तक्रारीही दाखल केल्या होत्या.

या गंभीर प्रकरणाची दखल घेत पीएमपी महामंडळ प्रशासनाने संबंधित महिला कर्मचाऱ्याला तत्काळ निलंबित केले आहे. दरम्यान, पोलिसांनी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करून तिला अटक केली असून, पुढील चौकशी सुरू आहे.

पुण्यात वाढत्या हनीट्रॅप आणि ब्लॅकमेलच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ही घटना चिंताजनक मानली जात आहे. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, अशा प्रकारच्या फसवणुकीविरोधात कठोर कारवाईसाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे.

Spread the love

Leave a Reply

You may have missed