पुण्यात तीन बांगलादेशी पकडले, खोटी कागदपत्रे असल्याचा आरोप, सत्य आला समोर, अफवा फसवण्यावर होणार का कारवाई? – व्हिडिओ
पुणे: पोलीस उपायुक्त झोन एक यांच्या प्राथमिक अहवालानुसार, या तिघांचा मूळ पत्ता बिहार आहे, अशी माहिती समोर आली आहे. ते २७ जुलै रोजी पुण्यात दाखल झाले होते आणि जवळपास एक महिन्यासाठी इथे आले होते. बिहारमधील एका मदरशामध्ये हे शिकवणीचे काम करतात. मात्र, पुण्यातील कोढंवा भागातील मुस्लिम धार्मिक उलेमांनी दिलेल्या परवानगीसह हे पुण्यात वर्गणी गोळा करण्यासाठी आले होते. या तिघांकडे परवानगीपत्र देखील आहे, अशी माहिती संदीप गिल यांनी दिली आहे.