पुण्यात पुढचे तीन तास धोक्याचे; मुसळधार पावसाचा इशारा

पुणे : हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जाहीर केला आहे. पुढील तीन तासांमध्ये जिल्ह्याच्या विविध भागांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असून, काही ठिकाणी वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, विशेषतः उघड्या जागेत न थांबणे, विजेच्या कडकडाटादरम्यान सुरक्षित ठिकाणी आसरा घेणे आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पावसाची ही तीव्रता काही काळ कायम राहू शकते. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना सतर्क राहून आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे.
पावसाचा जोर वाढल्यास रस्त्यावरील वाहतूक आणि नागरिकांच्या दैनंदिन हालचालींवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.