लाडक्या बहिणींच्या ई-केवायसीला पुन्हा महिन्याची मुदतवाढ;

n6949015211766999722836b9ca52f638fcfe2ffd2838d80f8a97660e22282581b56906a615a29531629121.jpg

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील दीड कोटी महिलांना ई-केवायसी करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. अजूनही सुमारे ४५ लाख महिलांनी ई-केवायसी केलेली नाही.

लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुरवातीला एक कोटी ५६ लाख महिला होत्या, पण निकषांच्या आधारे पडताळणी केल्यानंतर आता एक कोटी दहा लाखांपर्यंतच लाभार्थी राहिले आहेत. तरीपण, आता योजनेच्या निकषांनुसारच ज्या महिला लाभार्थीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे त्यांची पडताळणी केली जात आहे. त्यासाठी ‘ई-केवायसी’च्या माध्यमातून लाभार्थी व त्यांच्या कुटुंबप्रमुखाचे आधारलिंक केले जात आहे.

पुढे अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या लाभार्थींचा लाभ कायमचा बंद केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर ई-केवायसीसाठी आता दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली जाणार आहे. त्या मुदतीत लाडक्या बहिणींना ई-केवायसी करावीच लागणार आहे. १ एप्रिलनंतर ई-केवायसी न केलेल्यांचा लाभ बंद होऊ शकतो, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील दीड कोटी महिलांना ई-केवायसी करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. अजूनही सुमारे ४५ लाख महिलांनी ई-केवायसी केलेली नाही.

Spread the love

You may have missed