शिक्रापूरकर नागरिक झाले कंगाल! पोलीस झाले मालामा… जुगार अड्ड्यांना पोलीस छत्रछाया, नागरिकांचे भविष्य पणाला

0

पुणे : कायद्याचा रक्षकच जर भक्षक बनला तर सामान्य माणसाने कुठे न्याय मागायचा? शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी दुपारी ते रात्रीपर्यंत आठवडी बाजारात बेकायदेशीर जुगाराचा उघड उघड बाजार भरतोय. लखन राजपूत आणि राहुल साळवे उर्फ हडक्या हे दोन महारथी, दहा-बारा असामाजिक घटकांसह लाल-काळ्याचा खेळ मांडतात, आणि आश्चर्य म्हणजे पोलिसांची गाडी मात्र त्यांना वळसा घालून जाते!

पहा व्हिडिओ

नागरिक हरल्यानंतर गुगल पे, फोन पेवरून ऑनलाइन पैसे घेऊ रोख रक्कम जुगार खेळण्यासाठी दिली जाते—हा डिजिटल डकैतीचा नव्या पिढीला दाखवलेला आदर्श आहे काय? नागरिकांचे पैसे गिळून हे अड्डे मालामाल होत आहेत, आणि लोक मात्र कंगाल.

वरिष्ठ पोलिसांची दिशाभूल करून स्थानिक पातळीवरील काही भ्रष्ट पोलिसांचा आशीर्वाद या जुगाऱ्यांना मिळतोय, असा उघड संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या नावाने पगार घेणारे पोलीसच जर बेकायदेशीर धंद्याचे राखणदार बनले, तर गुन्हेगारांना अजून काय हवे?

जुगाराच्या या विषारी वेलीमुळे समाजात गुन्हेगारी वाढतेय, निष्पाप लोक आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत, आणि तरुणाईचे भविष्य धोक्यात आले आहे. पण प्रशासनाच्या कानावर जणू काही ऐकूच जात नाही!

स्थानिकांची मागणी ठाम आहे –
 या लाल-काळ्या अड्ड्यांवर तात्काळ धाड टाकावी
 दोषींना अटक करून तुरुंगात टाकावे
 पोलिसांतील सांगाडा साफ करून जनतेचा विश्वास परत मिळवावा

अखेर, पोलीस झाले मालामा आणि शिक्रापूरचे नागरिक कंगाल – अशी परिस्थिती जर बदलायची असेल, तर भ्रष्टाचाराच्या या जुगाराच्या पत्त्यांचा बंगलाच उद्ध्वस्त करावा लागेल. नाहीतर, समाज सुरक्षित आणि समृद्ध होईल, ही अपेक्षा केवळ दिवास्वप्न ठरेल.

Spread the love

Leave a Reply

You may have missed