प्रचार संपला, आता चुहा मिटिंगचा जोर! मतदारांची मनं जिंकण्यासाठी धडपड अजून सुरू!

0

चुनाव प्रचार संपला, आता मतदारांच्या गाठीभेटींना जोर!

पुणे: विधानसभा निवडणुकीचा जाहीर प्रचार संपल्यावर उमेदवार आणि कार्यकर्त्यांची चहलपहल आता गावा-गावांत पाहायला मिळते. पुढील 48 तास या निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असून, याच काळात मतदारांच्या मनावर प्रभाव पाडण्याचे प्रयत्न सुरु असतात.

चुहा मिटिंगमधून अंतिम रणनितीची आखणी
उमेदवार गावोगाव फिरून प्रमुख व्यक्ती, कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक आणि स्थानिक पुढाऱ्यांची भेट घेत आहेत. चुहा मिटिंगच्या माध्यमातून मतदारांना आपल्याकडे वळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यात मतदारांना विश्वासार्ह वचनं देत शपथा घालण्याचे आणि बेलभंडारा देण्याचे कार्यक्रम पार पडत आहेत.

तारेवरच्या मतदारांची जुळवाजुळव
तारेवरच्या म्हणजेच अद्याप निर्णय न घेणाऱ्या मतदारांच्या याद्या तयार केल्या जात आहेत. त्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी कार्यकर्त्यांची नियुक्ती केली जाते. मतदारसंघातील मोठ्या कुटुंबांसोबत खासगी बैठका घेत त्यांची मागणी ऐकून घेतली जाते. या मागण्या सार्वजनिक नसून, खासगी स्वरूपाच्या असतात.

शहरी भागातील नवा ट्रेंड
शहरांमध्ये सोसायट्या आणि चाळींच्या कमिट्या यांच्याशी उमेदवार थेट संपर्क साधत आहेत. सोसायटीतील मतदारसंख्या लक्षात घेऊन त्यांना सहलींचं आमिष दाखवलं जातं. शिर्डी, पंढरपूरच्या यात्रांपासून वॉटरपार्कच्या सहलीपर्यंत वेगवेगळे पर्याय मतदारांना दिले जात आहेत. उच्चभ्रू मतदारांनाही आकर्षित करण्यासाठी नवनवीन तंत्रांचा वापर होत आहे.

20 नोव्हेंबरला ठरणार भवितव्य
जाहीर प्रचार संपल्यानंतर उमेदवारांचे हे अखेरचे प्रयत्न निवडणुकीतील यशासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. 20 नोव्हेंबरला होणाऱ्या मतदानात मतदारांचा कौल कसा असेल हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार असून, निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर होईल.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *