लाचखोरीविरोधात कठोर पावले: MBOCWWB कडून त्वरित सेवासमाप्ती धोरण लागू – मुख्य कार्यकारी अधिकारी

IMG_20250214_162017.jpg

मुंबई : बांधकाम कामगारांसाठी काम करणाऱ्या महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण मंडळाने (MBOCWWB) लाचखोरीविरोधात कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक कुंभार यांनी यासंदर्भात कडक आदेश जारी केले आहेत.

या आदेशानुसार, बांधकाम कामगारांनी केलेल्या अर्जांवर कोणत्याही प्रकारे त्रुटी दाखवून त्यांना परत पाठविणे किंवा अडवणूक करणे आता निषिद्ध ठरविण्यात आले आहे. जर कोणत्याही कर्मचाऱ्याविरुद्ध लाच मागितल्याची तक्रार कॉल, संदेश किंवा पत्राद्वारे आली, तर संबंधित कर्मचाऱ्याची सेवा तातडीने समाप्त केली जाईल आणि त्याच्याविरुद्ध चौकशी सुरू केली जाईल.

महत्त्वाचे म्हणजे, अशा प्रकरणांमध्ये कोणत्याही प्रकारच्या शिफारसी अथवा संदर्भ विचारात घेतले जाणार नाहीत. आरोप सिद्ध झाल्यास दोषी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.

संस्थेतील प्रामाणिकता आणि नैतिकता कायम ठेवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले असून सर्व कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कामगार मंत्री व प्रधान सचिवांच्या निर्देशानुसार हा आदेश काढण्यात आला असून, भ्रष्टाचाराला आळा घालण्याच्या दृष्टीने MBOCWWB ची ही ठोस कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.

Spread the love

You may have missed