पुण्यात “रन फॉर युनिटी” मॅरेथॉनचे आयोजन
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त येरवडा पोलिसांचा उपक्रम
पुणे : देशाचे लोखंड पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त येरवडा पोलीस स्टेशनतर्फे “रन फॉर युनिटी मॅरेथॉन/वॉक” या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी साडेसहा वाजता पार पडणार असून परिसरातील नागरिकांना उत्साहाने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या मॅरेथॉनसाठी पांढरा टी-शर्ट, ट्रॅक पॅन्ट आणि शूज असा ड्रेस कोड ठेवण्यात आला आहे. एकता आणि राष्ट्रीय ऐक्याचा संदेश देणाऱ्या या धावस्पर्धेतून नागरिकांमध्ये राष्ट्रभावना आणि शारीरिक तंदुरुस्तीबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या उपक्रमाचे निमंत्रक येरवडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अंजुम बागवान असून त्यांनी परिसरातील सर्व नागरिक, युवक आणि विद्यार्थ्यांना या मॅरेथॉनमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
या कार्यक्रमात पोलिस अधिकारी, स्थानिक नागरिक, विद्यार्थी तसेच विविध सामाजिक संस्थांचा सहभाग अपेक्षित आहे.