पुण्यात ७५ मॉडेल शाळांचा संकल्प: महापालिका आयुक्तांची घोषणा

0
IMG_20250913_122209.jpg



पुणे : विद्यार्थ्यांनी समाजात सक्षमपणे उभे राहावे, हेच शिक्षकांचे मुख्य ध्येय असते. शिक्षण केवळ पाठांतरावर न थांबता कौशल्याधारित व्हावे, यावर भर देत पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी येत्या वर्षभरात ७५ मॉडेल शाळा उभारण्याचा संकल्प जाहीर केला.

बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त एम. जे. प्रदीप चंद्रन, उपायुक्त विजयकुमार थोरात, प्रशासकीय अधिकारी सुनंदा वाखारे, माध्यमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे, उपप्रशासकीय अधिकारी शुभांगी चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

आदर्श शिक्षकांचा सन्मान
महापालिकेच्या प्राथमिक तसेच खासगी शाळांतील १० शाळांमधील पाच आदर्श शिक्षकांना मानपत्र, सन्मानचिन्ह आणि टॅब देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांना ई-लर्निंगद्वारे शिक्षण देणे, स्पर्धा परीक्षांमध्ये त्यांना सहभागी करून घेणे आणि त्यांच्या प्रगतीसाठी सतत प्रयत्नशील राहणे, या योगदानासाठी शिक्षकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

भविष्यातील शैक्षणिक दिशा
“पुढील तीन वर्षांत सर्व शाळांना मॉडेल शाळांमध्ये रूपांतरित करण्याचा संकल्प आहे,” असे आयुक्तांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी महापालिकेतर्फे पुस्तक मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

मराठी संस्कृती व भाषा उच्च दर्जाची असून, शिक्षणाच्या माध्यमातून तिची जपणूक होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन करून आयुक्तांनी शिक्षकांनी स्वतः उदाहरण घालून विद्यार्थ्यांना प्रेरित करावे, असे आवाहन केले.


Spread the love

Leave a Reply