रेशन कार्डधारकांना 31 डिसेंबरपर्यंत हे काम करावेच लागणार! अन्यथा नाव कट होणार

0
IMG_20251219_120740.jpg

मुंबई : सार्वजनिक वितरण व्यवस्थेत (PDS) वर्षानुवर्षे सुरू असलेल्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकारने आता थेट आणि कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षाकायद्याअंतर्गत दिले जाणारे रेशन केवळ पात्र आणि गरजू कुटुंबांपर्यंतच पोहोचावे, या उद्देशाने अन्न व ग्राहक संरक्षण विभागाने विशेष तपासणी आणि पडताळणी मोहीम हाती घेतली आहे.

या मोहिमेमुळे बनावट नावे, अपात्र लाभार्थी आणि चुकीच्या नोंदी बाहेरपडणारअसूनरेशनव्यवस्थेत पारदर्शकता येण्याची अपेक्षा आहे.

अंतिम तारीख काय?

सरकारच्या निर्देशानुसार, आता केवळ कागदपत्रांवर अवलंबून न राहता प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पडताळणी केली जाणार आहे. संशयास्पद, चुकीच्या किंवा नियमबाह्यआढळणाऱ्या नोंदी थेट संगणक प्रणालीतून वगळल्या जाणार आहेत.

आधारकार्ड लिंक करावे लागणार?

या विशेष मोहिमेचा कणा म्हणजे ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया. आधारशीरेशनकार्ड लिंक करणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. ज्या लाभार्थ्यांनी अद्याप ई-केवायसी पूर्ण केलेली नाही, त्यांना भविष्यात रेशन मिळण्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे प्रशासनाने ग्रामपातळीपासून शहरांपर्यंत या माहितीचा व्यापक प्रसार करण्याच्या सूचना दिल्या आहेत, जेणेकरून कोणतेही पात्र कुटुंब केवळ माहितीअभावी लाभापासून वंचित राहू नये.

काय फायदा होणार?

या प्रक्रियेमुळे रेशन व्यवस्थेतील अनावश्यक भार कमी होईल. अपात्र नावे आपोआप वगळली गेल्याने साठ्याचा गैरवापर थांबेल आणि ज्या कुटुंबांना खरोखर अन्नधान्याची गरज आहे, त्यांना वेळेवर आणि पूर्ण प्रमाणात रेशन मिळू शकेल. यामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्था अधिक सक्षम आणि विश्वासार्ह बनेल, असा प्रशासनाचा दावा आहे.

ई केवायसी म्हणजे काय?

ई-केवायसी म्हणजे नेमके काय? याबाबत अनेक नागरिकांमध्ये संभ्रम आहे. ई-केवायसी ही एक डिजिटल पडताळणी प्रक्रिया असून, त्यामध्ये रेशनकार्डधारकाची ओळख आधारच्या माध्यमातून बायोमेट्रिक पद्धतीने तपासली जाते. फिंगरप्रिंट किंवा आयरिसस्कॅनद्वारे ही पडताळणी केली जाते. ही प्रक्रिया पूर्ण न झाल्यास संबंधित रेशनकार्डवरील धान्य वितरण थांबवले जाऊ शकते.

ई केवायसी कशी कराल?

ई-केवायसी करण्यासाठी लाभार्थ्यांनी आपल्या जवळच्या रेशन दुकानात जावे. कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड आणि रेशनकार्ड सोबत नेणे आवश्यक आहे. रेशन दुकानदाराकडे उपलब्ध असलेल्या पीओएसमशीनद्वारे बोटांचे ठसे किंवा डोळ्यांचे स्कॅन घेऊन प्रक्रिया पूर्ण केली जाते.

Spread the love

Leave a Reply

You may have missed