पुण्यात ‘अल डीनेरो’ रुफ टॉप हॉटेलवर छापा; बेकायदेशीर हुक्का बार उघडकीस; हॉटेल मालक आणि सहकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : नेहरू रस्त्यावरील ‘अल डीनेरो’ या रुफ टॉप हॉटेलमध्ये बेकायदेशीर हुक्का बार चालविल्याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी हॉटेल चालकासह चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पोलिसांनी हुक्क्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे.
“डीसीएन न्यूज पुणे” ला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेवनलव्हज चौकातील मोदी प्लाझा बिल्डिंगमध्ये ‘अल डीनेरो’ नावाचे हॉटेल असून येथे तंबाखूजन्य फ्लेवर आणि हुक्का साहित्य ठेवून बेकायदेशीर पार्लर सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली.
या प्रकरणी दीपक सतभूषण जैन (४३, रा. म्हाडा बिल्डिंग, महर्षी नगर), मासोद अफसर मुल्ला (२३), युवराज लक्ष्मण परिहार (२०) आणि हॉटेल मालक प्रतीक विकास मेहता (३३, रा. चव्हाण नगर, धनकवडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
या प्रकरणी पोलीस अंमलदार अमोल जाधव यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास स्वारगेट पोलिस करीत आहेत.