पुणे: फिनिक्स मॉलजवळील AC शौचालयाचे काम ठप्प; आम आदमी पार्टीकडून आंदोलनाचा इशारा

पुणे : विमाननगर परिसरातील फिनिक्स मॉलजवळ पुणे महापालिकेतर्फे उभारण्यात येणाऱ्या एसी शौचालयाचे काम अचानक बंद करण्यात आले आहे. या कामाला फिनिक्स मॉल व्यवस्थापनाने विरोध केला की राजकीय दबावामुळे हे काम थांबविण्यात आले, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
नगर रोड विभागाच्या सहाय्यक आयुक्त शीतल मॅडम यांना लेखी निवेदन देत आम आदमी पार्टीचे प्रभाग क्रमांक ३ अध्यक्ष फुलचंद म्हस्के यांनी या प्रकरणात स्पष्टीकरण मागितले आहे. “फिनिक्स मॉलच्या साइडला मारुती शोरूम शेजारी एसी शौचालयाचे काम सुरू होते. मात्र, अचानक काम थांबले. यामागे कोणाचा राजकीय हस्तक्षेप आहे का, याबाबत प्रशासनाने उत्तर द्यावे,” अशी मागणी म्हस्के यांनी केली.
तसेच, हे काम तातडीने सुरू करण्यात यावे, अन्यथा आम आदमी पार्टीकडून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.



—