Pune Water Cut: पुणेकरांनो लक्ष द्या, शहरातील ‘या’ भागात शनिवारी येणार नाही

0

पुणे – पद्मावती परिसरातील मुख्य जलवाहिनीत गळती झाल्यामुळे शनिवारी (उद्या) पुणे दक्षिण भागातील अनेक परिसरांचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. या दुरुस्तीच्या कामामुळे रविवारी सकाळी उशिरा कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू होणार आहे. महापालिकेने यासंदर्भात नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

पर्वती एचएलआर गोल टाकीवरून पद्मावती पंपिंग स्टेशनला येणाऱ्या 1000 मिलिमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीमध्ये पद्मावतीतील अवंती सोसायटीजवळ गळती झाल्याची नोंद झाली आहे. या गळतीच्या दुरुस्तीमुळे सेमिनरी टाकी, बिबवेवाडी टाकी, तळजाई टाकी आणि अप्पर इंदिरानगर पंपिंग स्टेशन येथील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

पाणीपुरवठा बंद राहणारे प्रमुख परिसर

या कामाचा परिणाम सहकारनगर, पद्मावती, तळजाई, बिबवेवाडी, गंगाधाम, महर्षीनगर, लोअर आणि अप्पर इंदिरानगर, सॅलीसबरी पार्क, मार्केट यार्ड परिसर, गुलाबनगर, के.के. मार्केट परिसर, मनमोहन पार्क, स्टेट बँकनगर आणि विविध सोसायट्या यांसारख्या अनेक परिसरांवर होणार आहे. तसेच बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावरील अनेक निवासी भागही या बंदीमुळे प्रभावित होतील.

पाणीपुरवठा प्रभावित राहणाऱ्या परिसरातील नागरिकांनी पाणी साठवण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *