पुणे: विश्रांतवाडी भीम नगरमध्ये रखडलेले महावितरणचे काम पूर्ण;
विशाल भोसले, शुभम वाघमारे व इरफान शेख यांच्या पुढाकाराला यश

पुणे – विश्रांतवाडीतील सर्वे नं. ४६, भीम नगर परिसरात गेल्या वर्षभरापासून रखडलेले महावितरणचे काम अखेर पूर्ण झाले आहे. या कामामुळे स्थानिक रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.
या संदर्भात रहिवासी अनिल पटेकर यांनी वारंवार तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे ऑनलाईन तक्रार दाखल केली होती. त्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांत प्रतिसाद मिळताच कामाला गती मिळाली.


कामाच्या सुरुवातीस मोठा खड्डा खोदून तो बुजवण्यात आला होता; मात्र ठेकेदार जमादार यांच्या अडचणीमुळे काम अपूर्ण राहिले होते. या वेळी स्थानिक युवा कार्यकर्ते विशाल भाऊ भोसले, शुभम भाऊ वाघमारे व इरफान भाऊ शेख यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या हस्तक्षेपानंतर दुसऱ्याच दिवशी महावितरणकडून नवीन पोल बसवण्यात आला.
जुना पोल काढून दुसऱ्या ठिकाणी नवीन पोल उभारण्यात आला असून परिसरातील वीजपुरवठा सुकर झाला आहे.
या कामाबाबत अनिल पटेकर यांनी पुढाकार घेणाऱ्या तिघांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार मानले आहेत.
—