पुणे: महाराष्ट्र माझा न्युजच्या बातमी नंतर दुसऱ्याच दिवशी विसर्जन घाट ‘स्वच्छ’; सहाय्यक आयुक्तांना काम कोणाला दिलंय, याची अखेर माहिती?

पुणे : गणेशोत्सवातील शेवटचा आणि महत्वाचा टप्पा म्हणजे विसर्जन. भाविकांची सोय पाहता पुणे महानगरपालिकेने येरवडा चिमा गार्डन विसर्जन घाटासाठी तब्बल ५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. मात्र प्रत्यक्षात घाटावरील परिस्थिती पाहता, निधीचा वापर नेमका कुठे झाला, असा प्रश्न भाविक आणि स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.
घाटावर रंगरंगोटी अर्धवट, बसण्यासाठी असलेल्या बाकड्यांवर प्रचंड घाण, सभामंडप अपूर्ण अवस्थेत, तर शौचालयात दिव्यांची कोणतीही व्यवस्था नव्हती. या परिस्थितीमुळे विसर्जनासाठी आलेल्या भाविकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.

महाराष्ट्र माझा न्युजच्या प्रतिनिधीने ही बाब उघडकीस आणल्यानंतर प्रशासन हलले. दुसऱ्याच दिवशी रंगरंगोटी पूर्ण करण्यात आली, शौचालयात दिव्यांची सोय करण्यात आली, तसेच बाकड्यांची साफसफाईही करण्यात आली.
स्थानिक नागरिकांनी मात्र प्रशासनावर उपरोधिक भाषेत टीका करत विचारले की, “हे काम कोणाला देण्यात आले होते याची माहिती सहाय्यक आयुक्तांना झाली असावी, असंच वाटतंय!”