पुणे: “पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे पुण्यात आज वाहतूक मार्गात तात्पुरते बदल”
पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, शहरातील वाहतूक व्यवस्थेला अधिक सुरक्षित आणि सुरळीत ठेवण्यासाठी, २६ सप्टेंबर रोजी तात्पुरत्या स्वरूपात विविध ठिकाणी ड्रॉप पॉइंट आणि पार्किंगच्या जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.
समारंभाला येणाऱ्या बसेससाठी कोथरूडमधील डी. पी. रस्ता आणि मार्केट यार्डमधील शिवनेरी मार्गावर पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती वाहतूक पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली.
नागरिकांसाठी पार्किंगची ठिकाणे: भिडे पूल नदी पात्र (पावसाच्या स्थितीनुसार), नीलायम टॉकीज, पाटील प्लाझा, विमलाबाई गरवारे शाळा, न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड, आबासाहेब गरवारे महाविद्यालय, डी. पी. रोड म्हात्रे पुलाजवळ, कटारिया हायस्कूल, न्यू इंग्लिश स्कूल रमनबाग, मिनर्व्हा पार्किंग मंडई, हरजीवन हॉस्पिटल सावरकर चौक, हमालवाडा पार्किंग, आणि पीएमपी मैदान-पूरम चौक येथे पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
बसेससाठी मार्ग: – डेक्कन – खंडोजीबाबा चौक – टिळक चौक – सेनादत्त पोलीस चौकी – उजवीकडे वळून म्हात्रे पूल – डावीकडे डी. पी. रस्ता. – सावरकर चौकातून येणाऱ्या बसेससाठी दांडेकर पुलावरून सरळ राजाराम पूल – उजवीकडे वळून डी. पी. रस्ता. – सिंहगड मार्गावरून येणाऱ्या बसेससाठी दांडेकर पूल – सावरकर पुतळा – मित्रमंडळ चौक – व्होल्गा चौक – सातारा रोड मार्केट यार्ड जंक्शनवरून शिवनेरी रस्ता.