पुणे: मतदानासाठी सुट्टी न दिल्यास आस्थापनांवर होणार कडक कारवाई; हेल्पलाइन क्रमांक जाहीर – त्वरित संपर्क साधा

0

मतदानासाठी भरपगारी सुट्टी देणे बंधनकारक: राज्य शासनाचा आदेश

पुणे, दि. १९: विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी राज्य शासनाने उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत सर्व आस्थापनांतील अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांना भरपगारी सुट्टी देण्याचे आदेश जारी केले आहेत. मतदानासाठी सुट्टी किंवा सवलत न दिल्यास आस्थापनांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अपर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ यांनी दिली आहे.

किमान २-३ तासांची सवलत बंधनकारक
विशेष परिस्थितीत पूर्ण दिवसाची सुट्टी देणे शक्य नसेल, तर संबंधित जिल्हाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेऊन मतदारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची सवलत देणे अनिवार्य असेल. कोणत्याही परिस्थितीत मतदानाचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी ही सवलत दिली जाईल, अशी सूचना संबंधित आस्थापनांना देण्यात आली आहे.

सर्व प्रकारच्या आस्थापनांना आदेश लागू
खासगी कंपन्या, दुकाने, निवासी हॉटेल्स, खाद्यगृहे, नाट्यगृहे, माहिती तंत्रज्ञान कंपन्या, मॉल्स आणि रिटेलर्स यांसह सर्व औद्योगिक व व्यावसायिक आस्थापनांना या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करावी लागेल. कामासाठी मतदारसंघाच्या बाहेर असलेल्या मतदारांनाही मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देणे आवश्यक राहील.

तक्रारीसाठी संपर्क सुविधा उपलब्ध
मतदानाच्या दिवशी सुट्टी अथवा सवलत न मिळाल्यास संबंधित कर्मचारी व कामगारांनी तक्रारीसाठी खालील अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा:

श्री. नि. अ. वाळके – 9975933416

श्रीमती त. श. अत्तार – 9890424813

श्री. डी. डी. पवार – 7775963065

श्री. बी. व्ही. लांडे – 9921971163

श्री. राजेंद्र ताठे – 9420763111


तसेच, ई-मेलद्वारे alcpune5@gmail.com किंवा dyclpune2021@gmail.com येथे तक्रार नोंदवता येईल.

मतदानाला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाचे पाऊल
मतदान हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे. त्यासाठी आवश्यक सुविधा देणे आस्थापनांची जबाबदारी आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई होणार असल्याचा इशारा राज्य शासनाने दिला आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *