पुणे : नेताजी सुभाष चंद्र बॉस शाळेत शिक्षकांची कमतरता: विद्यार्थ्यांचा आंदोलनाचा इशारा – व्हिडिओ
पुणे : येरवडा परिसरातील नेताजी सुभाष चंद्र बॉस माध्यमिक व उच्चमाध्यमिक क्रमांक २०८ ह्या शाळेत गेल्या एक वर्षापासून अर्थशास्त्र अकॉउंट ह्या विषयांचे दोन शिक्षकांच्या जागा रिक्त असून, यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. विद्यार्थ्यांनी अनेक वेळा गवळी सर व चव्हाण मॅडम ह्या शिक्षकांच्या नेमणुकीसाठी मागणी केली असली तरी, अद्याप कोणतीही नियुक्ती करण्यात आलेली नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.
विशेषतः अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या शिक्षकांची कमतरता तीव्रतेने भासत आहे. गेल्या वर्ष भरापासून रिक्त असलेल्या या पदांवर योग्य शिक्षकांची नेमणूक न झाल्यामुळे, विद्यार्थी अत्यंत नाराज असून त्यांनी आपला तीव्र संताप व्यक्त केला आहे. मुख्याध्यापकांनी या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केले आहे, असा आरोप उच्चमाध्यमिक विध्यार्थी तुषार सावंत व सर्व विध्यार्थानकडून केला जात आहे.
पहा व्हिडिओ
या गंभीर परिस्थितीत, संतप्त विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या आवारात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. “शिक्षकांच्या नेमणुकीची मागणी आम्ही अनेक वेळा केली आहे, परंतु शाळेय मुख्याध्यापक राहुल क्षीरसागर सरांनकडून व शिक्षणाधिकारी ह्यांच्या कडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही,” असे उच्चमाध्यमिक विध्यार्थी तुषार सावंत व सर्व विध्यार्थांनी स्पष्ट केले.
प्रशासनाने तातडीने या समस्येचे समाधान न केल्यास, शाळा बंद आंदोलन व टाळे ठोक आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सर्व संतापलेले विद्यार्थ्यांनी दिला आहे.