पुणे: वाहतूक पोलिसांच्या कागदी नियमावलीतच अडकली सुरक्षा यंत्रणा; पोलिसांचे दुर्लक्ष की नियोजनाचा अभाव? जड वाहनांवरील कारवाई प्रश्नचिन्हांत

IMG_20241224_093547.jpg

पुण्यात जड वाहनांचा उपद्रव; अपघात आणि नियमांचे उल्लंघन वाढले

पुणे: शहरातील वाहतूक कोंडी आणि अपघातांमध्ये जड वाहनांचा वाटा मोठा असल्याचे लक्षात घेऊन पुणे पोलिसांनी कागदावर कठोर नियमावली तयार केली असली तरी, प्रत्यक्षात तिची अंमलबजावणी फसल्याचे चित्र आहे. नियमांनुसार जड वाहनांना ठराविक वेळेतच शहरात प्रवेश दिला जातो. मात्र, अनेकदा हे वाहनचालक नियमांची पायमल्ली करत आहेत, तर काही ठिकाणी पोलिसांच्याच आशीर्वादाने वाहने शहरात घुसखोरी करतात.

वाहतूक पोलिसांनी गेल्या अडीच महिन्यांत सुमारे १ लाख वाहनांवर कारवाई केली असून, यामध्ये ३२ हजार जड वाहनांचा समावेश आहे. तरीदेखील जड वाहने शहरात येतातच कशी, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

मेट्रो प्रकल्प, शासकीय कामांमुळे नियमांना तिलांजली

शहरात मोठ्या प्रमाणात मेट्रो, महापालिका आणि इतर शासकीय प्रकल्प सुरू असल्याने या कामांसाठी जड वाहनांना परवानगी दिली जाते. मात्र, याचा गैरफायदा घेत व्यावसायिक वाहनचालक नियम तोडून शहरात प्रवेश करतात. विशेषत: टँकर चालकांकडून कोणत्याही नियमांचे पालन होत नसल्याची तक्रार आहे. धायरी, सिंहगड रस्ता, वाघोली-लोणीकंद परिसर यांसारख्या भागांमध्ये अशा वाहनांची दहशत दिसून येते.

वाघोली-लोणीकंद परिसरात अपघातांचा उच्चांक

वाघोली-लोणीकंद परिसरात २०२४ या वर्षात ५४ जीवघेणे अपघात झाले असून, यामध्ये ८५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. पोलिसांच्या आकडेवारीनुसार यातील १२ अपघात डंपर चालकांमुळे झाले आहेत. रांजणगाव एमआयडीसीमुळे या रस्त्यावर जड वाहनांची प्रचंड वर्दळ असते. याशिवाय मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पांमुळे दिवसरात्र जड वाहनांची वाहतूक सुरूच असते. मात्र, इतक्या गंभीर परिस्थितीनंतरही पोलिसांकडून ठोस उपाययोजना केली गेली नाही.

डंपर चालकांकडून मद्यपान आणि बेजबाबदार वर्तन

डंपर चालकांकडून मद्यपान आणि बेजबाबदार वर्तनाचे प्रकार वारंवार समोर येत आहेत. नुकत्याच झालेल्या एका अपघातात चालकाने डंपरमध्येच मद्यपान केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी घटनास्थळी मद्याची बाटली जप्त केली असून, चालकानेही मद्यपानाची कबुली दिली आहे. लांब प्रवासासाठी चालक रस्त्याच्या कडेला किंवा ढाब्यावर थांबून मद्यपान करत असल्याचे प्रकारही उघड झाले आहेत.

स्थनिकांचा पोलिसांवर दुर्लक्षाचा आरोप

धायरी, सिंहगड रस्ता, वाघोली यांसारख्या भागांमध्ये जड वाहनांमुळे स्थानिक नागरिक त्रस्त आहेत. पादचारी आणि वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. स्थानिकांच्या मते, पोलिसांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.

वाहतूक पोलिसांकडून जड वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कागदोपत्री नियम तयार केले असले तरी, त्याची प्रभावी अंमलबजावणी न केल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Spread the love

You may have missed