पुणे: ससूनमध्ये पुन्हा सुरक्षा उघडीपणे – 11व्या मजल्यावरून रुग्णाची उडी! पोलिसांनी वाचवला, पण ससूनने हरवला – कुठे जातेय व्यवस्था?

पुणे : “मनोरुग्णांचे रक्षण करणे हेच काम असलेले रुग्णालयच जर त्यांच्या सुरक्षिततेत कमी पडत असेल तर मग सामान्य रुग्णांनी काय करावे?” – असा सवाल पुन्हा एकदा ससून रुग्णालयाच्या बाबतीत उभा राहिला आहे.
आज सकाळी ससूनच्या 11व्या मजल्यावरून विजय नावाच्या रुग्णाने उडी मारून आत्महत्या केली. विजय याला 5 सप्टेंबर रोजी रेल्वे पोलिसांनी उपचारासाठी दाखल केले होते. यापूर्वी त्याने रेल्वेसमोर आत्महत्येचा प्रयत्न केला होता. स्पष्ट आहे की, तो उच्च जोखमीचा रुग्ण होता. मग प्रश्न असा – इतक्या गंभीर प्रकरणाकडे रुग्णालय प्रशासनाचे लक्ष कुठे होते?
पहा व्हिडिओ
रुग्णांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी कोणाची? मानसिक आरोग्य विभागात 24 तास पहारा हवा, पण वास्तव मात्र वेगळेच दिसते. ‘प्रसिद्ध’ ससून रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेत आले आहे ते उपचारांपेक्षा सुरक्षेतील ढिसाळपणामुळे.
गेल्या काही महिन्यांत उपचाराअभावी रुग्णांचे मृत्यू, बेड न मिळाल्याने झालेल्या हालअपेष्टा, आणि आता मनोरुग्णाचा आत्मघात – अशी मालिका ससूनच्या माथी का? हा प्रश्न आता आरोग्य व्यवस्थेच्या पायाभूत जबाबदाऱ्यांवरच टोलवला जातोय.
पोलिसांनी तपास सुरू केला आहे, पण तपासाऐवजी खरा उपाय हवा – रुग्णालयातील सुरक्षा कडक, मनोरुग्णांच्या देखरेखीत काटेकोरपणा, आणि मानसिक आरोग्याकडे गंभीर दृष्टी. नाहीतर, “ससून” हे नाव पुणेकरांसाठी विश्वासाऐवजी धोक्याचे प्रतीक ठरणार, अशी भीती आहे.
—