पुणे: ससून रुग्णालयाची हलगर्जी उघड! तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा

IMG_20250422_104454.jpg

पुणे – तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात एक मोठा वळण आले असून, ससून रुग्णालयाने तपासात हलगर्जी केल्याचे समोर आले आहे. पुणे पोलिसांनी पाठवलेल्या पत्रानंतर ससून प्रशासनाने सुधारित अहवाल सादर केला असून, मूळ अहवालातील त्रुटींवर प्रकाश पडला आहे.

पोलिसांच्या चौकशी अहवालात ससून रुग्णालयाने दिलेल्या क्लीन चिटवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि डॉ. सुश्रुत घैसास यांना निर्दोष ठरवण्यात काही हेतुपुरस्सरता होती का, असा संशय निर्माण झाला आहे.

पोलिसांनी ससूनकडे चार महत्वाच्या मुद्द्यांवर स्पष्टीकरण मागितले होते.

1. हाय रिस्क स्थितीतही उपचारात दिरंगाई का झाली?


2. गंभीर प्रकृती असूनही डॉ. घैसास यांनी तात्काळ उपचार का केले नाहीत?


3. पाच तास उपचाराशिवाय रुग्ण का ठेवण्यात आला?


4. ओपीडी अॅसेसमेंट रूममध्ये वैद्यकीय हस्तक्षेप न केल्यामुळे रुग्णाने रुग्णालय सोडण्याचा निर्णय घेतला का?



या प्रश्नांवर आधारित सुधारित अहवाल सादर करत ससून प्रशासनाने आपली चूक अप्रत्यक्षपणे मान्य केल्याचे दिसून येते.

दरम्यान, आणखी एक महत्वाचा मुद्दा पुढे आला आहे. डॉ. सुश्रुत घैसास सोमवारी मेडिकल कौन्सिलच्या सुनावणीला गैरहजर राहिले. त्यांनी ईमेलद्वारे आपली बाजू मांडण्याची भूमिका घेतली आहे. ही सुनावणी मुंबईत पार पडली होती.

भिसे कुटुंबियांनी डॉ. घैसास यांच्यासह दीनानाथ रुग्णालयातील इतर चार जणांची वैद्यकीय सनद रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच, रुग्णालयाच्या अहवालात तनिषा भिसे यांची खासगी माहिती उघड केल्याच्या कारणास्तवही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

संपूर्ण प्रकरणावरुन वैद्यकीय यंत्रणेतील जबाबदारी, पारदर्शकता आणि रुग्णाच्या हक्कांबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Spread the love

You may have missed