पुणे: धुळीत हरवली सुरक्षितता: पुण्यात धुळीने गुदमरलेलं जीवन; पोलिसांची कारवाई ठरली केवळ दिखावा पोलिसांचा फक्त ₹१५०० दंडाचा सौदा!
पुणे, दि. २७ ऑक्टोबर २०२५ : पुण्यातील डंपर विमाननगर व चंदन नगर परिसरात ट्रकचालकांकडून नियमबाह्यपणे धुळ सांडत वाहनचालना सुरू असल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. धुळीच्या ढगांत श्वास घेणं कठीण झालं असून, परिसरातील रहिवाशांचा आरोग्य आणि सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे.
पहा व्हिडिओ
या गंभीर प्रकाराकडे वाहतूक पोलिसांनी दुर्लक्ष केल्याची नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. आश्चर्य म्हणजे, अशा प्रकरणात केवळ ₹१५०० चा दंड आकारण्यात आला आहे. स्थानिकांच्या मते, हा दंड नाही तर नागरिकांच्या सुरक्षेचा सौदा आहे.
“धुळीच्या प्रदूषणामुळे मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रस्त्याने जाणारे लोक त्रस्त आहेत. पण वाहतूक विभाग मात्र मौन आहे, आणि जबाबदार अधिकारी झोपेत आहेत,” अशी टीका पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रतिनिधी करीम चांद शेख यांनी केली.
त्यांनी पुढे म्हटलं, “नागरिकांचा जीव एवढा स्वस्त आहे का? एवढ्या मोठ्या धोक्यावर फक्त ₹१५०० दंड म्हणजे ही कारवाई नाही, तर सुरक्षेची थट्टा आहे!”
डंपर विमाननगर व चंदननगर परिसरातील नागरिकांनी तात्काळ धुळीवर नियंत्रण आणण्यासाठी आणि ट्रकचालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव आता तरी जागं होऊन, नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या वाहनचालकांवर कठोर दंडात्मक पावलं उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.