गुरुवारी पुणेकरांना पाणीकपातीचा फटका; महत्त्वाच्या दुरुस्तीमुळे संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद

0
n67260347317525645595124136267226afc6b61bc8c7c7eb715437e6b3a6b931a7ceb31b851547e536be1f.jpg

पुणे | प्रतिनिधी
पावसाळ्याचे दिवस सुरू असले तरी पुणेकरांना गुरुवारी (दि. १७ जुलै) पाणीकपातीचा मोठा फटका बसणार आहे. पर्वती रॉ वॉटर पंपिंग स्टेशन येथील मुख्य वाहिनीच्या दुरुस्तीमुळे संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.

महापालिकेकडून गळती रोखण्यासाठी महत्त्वाचे दुरुस्ती काम हाती घेण्यात आले असून, या कामामुळे जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्र आणि त्याच्या अधीन येणाऱ्या सर्व टाक्या व पंपिंग केंद्रांचा पाणीपुरवठा गुरुवारी पूर्णतः ठप्प राहणार आहे. यामुळे शहरातील शेकडो भागांतील नागरिकांना एक दिवस पाण्याविना दिवस काढावा लागणार आहे.

शहरातील हे सर्व भाग पाण्याविना

या दुरुस्तीमुळे जुने पुणे शहर, सर्व जुन्या पेठा, पर्वती, शिवाजीनगर, डेक्कन, औंध, बोपोडी, स्वारगेट, सहकारनगर, बिबवेवाडी, कोंढवा, कोथरूड, कर्वेनगर, वारजे, बाणेर, बालेवाडी, पाषाण, बावधन, सुस रोड, एरंडवणा, लॉ कॉलेज रोड, जनवाडी, प्रभात रोड, डीपी रोड, सेनापती बापट रोड, हरिगंगा सोसायटी, खडकी आणि एनडीए रोड या प्रमुख भागांचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

वारजे, माळवाडी, गणपती माथा, गोकुळनगर, शिवणे, न्यू कोपरे, ताथवडे, रामनगर, उत्तमनगर, तसेच मुळा रोड, गणराज चौक, समर्थ कॉलनी, शाहू कॉलनी, हॅपी कॉलनी, जयभवानीनगर, केळेवाडी, पोलिस लाईन, करिष्मा सोसायटी, वडारवाडी आणि इतर परिसरातील नागरिकांनाही याचा फटका बसणार आहे.

शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने नागरिकांना पाणी साठवून ठेवण्याचे व पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे. गुरुवारी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद राहिल्यानंतर, शुक्रवारी सकाळी उशिरा कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू होईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

प्रशासनाकडून दक्षतेचे आवाहन

शहराच्या पाणीपुरवठा यंत्रणेतील गळती रोखण्याचे हे काम अत्यंत आवश्यक असून, नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पावसाळा सुरू असतानाही, पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी दुरुस्तीची गरज असल्याचे महापालिका पाणीपुरवठा विभागाचे म्हणणे आहे.

Spread the love

Leave a Reply

You may have missed