पुणे: राजीव गांधी रुग्णालयात ‘लिक्विड मेडिकल ऑक्सिजन प्लांट’ कार्यान्वित; एक वर्षाखालील बालकांसाठी २४ तास सेवा उपलब्ध

पुणे: येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालयात आरोग्य सेवेला बळकटी मिळणार आहे. रुग्णालयात लिक्विड मेडिकल ऑक्सिजन (एलएमओ) प्लांट उभारण्यात आला असून त्यात 10 केएल ऑक्सिजन भरून कार्यान्वित करण्यात आला आहे.
पहा व्हिडिओ
ही महत्त्वपूर्ण कामगिरी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नीना बोराडे व सहाय्यक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. वावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आली.
या रुग्णालयात एक वर्षाखालील बालकांसाठी २४ तास सेवा उपलब्ध असून, नव्या ऑक्सिजन प्लांटमुळे गंभीर रुग्णांसाठी उपचार अधिक सक्षम होतील.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, नव्याने उभारलेला प्लांट आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी मोठी मदत करणार असून रुग्णांना अखंडित ऑक्सिजन पुरवठा सुनिश्चित होणार आहे. पुण्यातील आरोग्य सुविधांच्या उन्नतीसाठी हे एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे.
—