पुणे: मुंढव्यात हुक्का पार्लरवर छापा; मालक-व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल; सात हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

n64830250017373517377981e2700fb9e1f4e8a480820532456930a9466fac9b5a158ad9e15e2a6cddf3470.jpg

मुंढवा : मुंढवा परिसरातील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या बेकायदा हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी हुक्का पात्र, सुगंधी तंबाखू असा सात हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी हॉटेल मालक आणि व्यवस्थापकाविरुद्ध सिगारेट आणि तंबाखूजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) कायद्यानुसार मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हे शाखेच्या युनिट पाचचे पथक गस्त घालत असताना हॉटेलमध्ये बेकायदा हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती पोलीस कर्मचारी तानाजी देशमुख यांना मिळाली. त्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्वरित छापा टाकून कारवाई करण्यात आली.

या मोहिमेत पोलीस निरीक्षक युवराज हांडे, सहायक निरीक्षक विजयकुमार शिंदे, पोलीस कर्मचारी तानाजी देशमुख, प्रमोद टिळेकर, पृथ्वीराज पांडुळे, शुभांगी म्हाळशीकर आणि संजयकुमार दळवी यांनी सहभाग घेतला.

अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखील पिंगळे आणि सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.

Spread the love

You may have missed