पुणे: खराडीतील बनावट कॉल सेंटरवर छापा; २०० पोलीस एकाचवेळी पोहोचले, १०० जणांना ताब्यात

IMG_20250524_120633.jpg

पुणे, दि. २४ मे: पुणे शहरातील खराडी परिसरात सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटरवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने शनिवारी धडक कारवाई करत छापा टाकला. ही कारवाई अत्यंत गोपनीय पद्धतीने करण्यात आली असून, तब्बल 150 ते 200 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते.

हे कॉल सेंटर खराडी-मुंढवा बायपासवरील ‘प्राईड आयकॉन’ इमारतीत सुरू होते. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे विशेष पथक तयार करून ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी या ठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवत परिसर सील केला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, या कॉल सेंटरच्या माध्यमातून परदेशातील नागरिकांना लक्ष्य करून आर्थिक फसवणूक केली जात होती. यामध्ये अनेक युवक-युवती काम करत असल्याचे आढळून आले असून, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या चौकशीला सुरुवात झाली असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

नेमके कोणते प्रकार या कॉल सेंटरमधून राबवले जात होते, याचा तपास पोलिसांकडून सुरू असून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Spread the love

You may have missed