पुणे: गणेश पेठेतील मासळीबाजारावर पुणे पोलिस आणि महापालिकेने मोठी अतिक्रमण कारवाई – व्हिडिओ

0
IMG_20250917_110022.jpg

पुणे: गणेश पेठेतील नागझरी नाल्यावर उभारलेल्या बेकायदा मासळी बाजारावर मंगळवारी पुणे पोलिस व महापालिकेने संयुक्त अतिक्रमण कारवाई केली. या वेळी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

पहा व्हिडिओ

सौजन्य: सिविक मिरर

माहितीनुसार, मासळी बाजारासाठी स्वतंत्र इमारत असतानाही आंदेकर यांच्या आशिर्वादाने नाल्यावर अतिक्रमण करून बेकायदा बाजार सुरू करण्यात आला होता. या बाजारातून आंदेकरला मोठा आर्थिक फायदा होत असल्याचेही समजते. पोलिसांनी याबाबत महापालिकेला पत्र दिल्यानंतर कारवाईला वेग आला.

दरम्यान, व्यापाऱ्यांनी मात्र कोणतीही पूर्वसूचना न देता कारवाई केल्याचा आरोप केला आहे. अचानक करण्यात आलेल्या या कारवाईमुळे व्यापार्‍यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

या संपूर्ण प्रकरणामुळे आंदेकरच्या आर्थिक स्त्रोतांवर मोठा आघात झाल्याची चर्चा सुरू आहे.


Spread the love

Leave a Reply