पुणे: घोडागाडी, बैलगाडीवर बसून पीएमपीएमएल दरवाढी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं आंदोलन – व्हिडिओ

पुणे, प्रतिनिधी — पीएमपीएमएल प्रशासनाने अलीकडेच बससेवेच्या दरात वाढ केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने पुणे महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीसमोर तीव्र आंदोलन करण्यात आले.
ही दरवाढ सर्वसामान्य पुणेकरांच्या खिशावर मार करणारी असून, त्याचा निषेध करण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी घोडागाडी व बैलगाडीचा वापर करून अभिनव पद्धतीने निषेध नोंदवला. या आंदोलनात पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
पहा व्हिडिओ
पक्षाचे पुणे शहराध्यक्ष व माजी महापौर प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पार पडले. यावेळी बोलताना जगताप म्हणाले, “पीएमपीएमएल ही सर्वसामान्य नागरिकांसाठी जीवनवाहिनी आहे. प्रशासनाने दरवाढ करून गरिबांवर अन्याय केला आहे. आम्ही या दरवाढीचा तीव्र निषेध करत असून ती तातडीने मागे घेण्याची मागणी करतो.”
आंदोलनादरम्यान पक्षाच्या वतीने प्रशासनाकडे अशी मागणी करण्यात आली की, ही दरवाढ तातडीने रद्द करून सामान्य पुणेकरांना दिलासा द्यावा.
या आंदोलनात माजी आमदार जयदेवराव गायकवाड, माजी शहराध्यक्ष रवींद्र माळवदकर, उदय महाले, निलेश निकम, श्रीकांत पाटील, औदुंबर खुणे पाटील, रोहन गायकवाड, योगेश पवार, वसुंधरा निर्भवणे, सुवर्णा सावर्डे, आशा साने, सुवर्णा माने, स्वाती पोकळे, वैशाली थोपटे, प्रभावती भूमकर, किशोर कांबळे, आनंद सवाणे, पोपटराव खेडेकर, वैजनाथ वाघमारे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
पक्षाच्या या आंदोलनामुळे प्रशासनावर दरवाढीबाबत पुन्हा विचार करण्यासाठी दबाव निर्माण होण्याची शक्यता आहे.