पुणे: कल्याणीनगरमध्ये विदेशी आर्टिस्टच्या कार्यक्रमाला आंदोलन; १४ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले

पुणे : येरवडा पोलीस स्टेशन हद्दीतील कल्याणीनगर येथील हॉटेल बॉलर येथे रविवारी (१४ सप्टेंबर) नेदरलँडचा नागरिक असलेल्या आर्टिस्ट इम्रान नासिर खान याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, सोशल मीडियावर खान हा पाकिस्तानी नागरिक असल्याची बातमी प्रसारित झाल्यानंतर काही संघटनांच्या कार्यकर्त्यांनी विरोध करण्यासाठी हॉटेलबाहेर जमाव केला.
पहा व्हिडिओ
कार्यक्रमाबाबत वस्तुस्थिती पोलिसांनी आंदोलकांना समजावून सांगितली. तरीदेखील, आंदोलकांनी हॉटेलकडे जाणाऱ्या नागरिकांना अडविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी तत्परता दाखवत १४ आंदोलकांना ताब्यात घेतले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेळके यांच्या नेतृत्वाखाली घटनास्थळी पुरेसा बंदोबस्त ठेवण्यात आला असून सध्या परिस्थिती पूर्णतः शांत आहे.
—