पुणे पोलिसांची धडक कारवाई: जुगार अड्ड्यावर छापा, भाजप पदाधिकारी ताब्यात

IMG_20250812_101123.jpg

पुणे – अवैध कृत्यांवर अंकुश ठेवण्यासाठी पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा धडक कारवाई केली आहे. नुकत्याच झालेल्या रेव्ह पार्टीवरच्या कारवाईनंतर, पोलिसांनी तळजाई परिसरातील एका जुगार अड्ड्यावर छापेमारी करून भाजप पदाधिकाऱ्यासह दोघांना ताब्यात घेतले.

गुन्हे शाखेच्या युनिट 2 आणि सहकारनगर पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार, तळजाई येथील एका रिकाम्या कारखान्यात जुगार खेळ सुरू असल्याची माहिती मिळाली होती. तत्काळ पथकाने धाड टाकून आरोपींना रंगेहाथ पकडले. सहकारनगर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

काही दिवसांपूर्वीच नारायण पेठ येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई करून एका सहायक पोलीस फौजदारासह 33 जणांना ताब्यात घेतले होते. त्या प्रकरणानंतर संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले होते. सततच्या कारवायांमुळे अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा धाक बसला आहे.

Spread the love