पुणे: गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांचा छापा; तिघांना अटक हुक्क्याचा साठाही जप्त

Hookah-Bars-Ban-in-Kolkata.webp

पुणे : गंगाधाम रोडवरील एका हॉटेलमध्ये बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर शनिवारी सायंकाळी पोलिसांनी छापा घालून तिघांना अटक केली. या कारवाईत हुक्का पॉट, तंबाखूजन्य पदार्थ व विविध फ्लेवर्स अवैधरित्या विक्रीसाठी ठेवलेले आढळून आले.

आरोपींची नावे भरत देवाप्पा गावडे (वय ३३), दिपेंद्र मानबहादूर खडका (वय ३०) आणि सिद्धार्थसिंग अशोककुमार सिंह (वय २२) अशी असून, हे सर्वजण शिवराय कॉलनी, अप्पर इंदिरानगर येथे राहणारे आहेत.

गुन्हे शाखेच्या युनिट ५ ला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, गंगाधाम रोडवरील आई माता मंदिराजवळील हॉटेल बिलियन्स लाऊन्ज येथे हुक्का पिण्यासाठी तंबाखूजन्य पदार्थ विकले जात असल्याची माहिती मिळाली. यानंतर सहायक पोलीस निरीक्षक सिसाळ यांच्या नेतृत्वाखाली टीमने छापा टाकून ही कारवाई केली.

या कारवाईदरम्यान, अफजल, अलफकर, अलकियान या फ्लेवर्सचे हुक्का पॉट विक्रीसाठी ठेवण्यात आलेले होते. ग्राहकांना धूम्रपानासाठी याचा वापर केला जात असल्याचे निष्पन्न झाले.

मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात हवालदार पृथ्वीराज पांडुळे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

Spread the love

You may have missed