पुणे: गांजा व्यवसायात भागीदार असणारा पोलीस अंमलदार तडकाफडकी निलंबित – व्हिडिओ

0
IMG_20250823_123850.jpg

पुणे : पुणे पोलिस दलातील एका शिपायाचे थेट अमली पदार्थ विक्रेत्यांशी संबंध असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणामुळे पुणे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

स्वारगेट पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला शिपाई नवनाथ कांताराम शिंदे याचे ड्रग्ज विक्री प्रकरणातील आरोपींशी आर्थिक व्यवहार व संगनमत असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. त्यानंतर शिंदे याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून, त्याच्याविरोधात NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.

पहा व्हिडिओ

अवैध धंद्यांना शिपायाचा पाठिंबा
मिळालेल्या माहितीनुसार, २० ऑगस्ट रोजी सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमली पदार्थांच्या अवैध धंद्यावर कारवाई करण्यात आली. या वेळी एका तरुणाकडून तब्बल ५ किलो गांजा जप्त करण्यात आला होता. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील चौकशीत आरोपींच्या मोबाईलमध्ये नवनाथ शिंदे यांचा नंबर “एन.बी.” या नावाने सेव्ह असल्याचे आढळले. चौकशीत आरोपींनी शिंदे सहकारनगर हद्दीत “कलेक्शन”चे काम करतात, तसेच गांजा व्यवसायात भागीदार असल्याची कबुली दिली.

अवैध धंद्यांचे रॅकेट उघड
स्वतः पोलिस पदावर असतानाही शिंदे याने आपल्या हद्दीत स्पा, पिठा, मटका, क्लब यांसारखे अवैध धंदे सुरू ठेवले असल्याची माहिती मेसेजच्या स्वरूपात पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार चौकशी सुरू करण्यात आली आणि शिंदे याची थेट गुंतवणूक असल्याचे उघड झाले.

दरम्यान, शासकीय सेवेत असलेला कर्मचारीच अमली पदार्थ विक्रेत्यांना मदत करत असल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिस दलाच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. या घटनेनंतर पुणे पोलिस दलात संतापाचे वातावरण असून पुढील चौकशी वेगाने सुरू आहे.


Spread the love

Leave a Reply