पुणे महापालिकेचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वाचा सविस्तर

n6295394191725509706789a28839dbdaa0240b36a3aac8d36c18d16ccded72d0c69140565b51013e8bfbe8.jpg

पुणे : पुणे महापालिकेतर्फे शिक्षण दिनानिमित्त जाहीर करण्यात येणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. महापालिकेच्या शाळेसह खासगी प्राथमिक शाळेतील १५ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

हा कार्यक्रम आज (ता.५) सकाळी ११ वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे. यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन गौरविले जाणार आहे. यावेळी आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले उपस्थित राहणार आहेत.

शिक्षण विभागाने आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी अर्ज मागविले होते, त्यामध्ये ९० शिक्षकांनी सहभाग घेतला होता. निवड समितीने राज्यसरकारच्या निकषाप्रमाणे कागदपत्रांची पडताळणी, मुलाखत घेऊन व वर्गभेटीद्वारे यातून १५ आदर्श शिक्षकांची निवड केली आहे.

या शिक्षकांना समारंभात मानपत्र, सन्मानचिन्ह आणि टॅब देऊन गौरविण्यात येणार आहे, असे शिक्षण विभागाच्या उपायुक्त आशा राऊत यांनी सांगितले.

हे आहेत पुरस्काराचे मानकरी

मनपा शाळा

सुनीता गायकवाड (मनपा शाळा क्रमांक. १८१ मुलांची, खराडी),

सुलताना मण्यार (सावित्रीबाई फुले, विद्यानिकेतन हडपसर),

चेता गोडसे (मनपा शाळा वाघोली शाळा क्रमांक १),

ललिता चौरे (मनपा शाळा क्रमांक ८७ मुलींची हडपसर),

बलभीम बोदगे (मनपा शाळा क्रमांक १२ मुलांची काळेबोराटे नगर),

निशिगंधा आवारी मनपा शाळा क्रमांक १९ मुलींची खराडी),

किरण गोफणे (मनपा शाळा क्रमांक ८७ मुलींची हडपसर),

सोनाली शिवले (मनपा शाळा क्रमांक ९९ मुलींची वडगावशेरी)

गणेश राऊत (मनपा शाळा क्रमांक १७१, काळे बोराटे नगर),

शर्मिला गायकवाड (मनपा शाळा क्रमांक ८२ मुलींची कोंढवा),

खासगी शाळा

ज्योत्स्ना पवार (हुजूरपागा कात्रज),

मोनिका नेवासकर (रँग्लर पु परांजपे प्राथमिक शाळा लक्ष्मी रस्ता),

मधुरा चौधरी (सारथी प्राथमिक विद्यालय, खराडी),

प्रिया इंदुलकर (नवीन मराठी शाळा, शनिवार पेठ),

संजय दरेकर (इऑन ग्यानांकूर स्कूल, खराडी).

Spread the love