पुणे महापालिकेत प्रशासनात बदलांची लाट; पुणे महापालिकेत तिघा अधिकाऱ्यांची नवीन नियुक्ती

PMC.webp

पुणे – राज्य सरकारने केलेल्या प्रशासकीय बदल्यांनुसार पुणे महापालिकेतील दोन उपायुक्तांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी तीन नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांच्या स्वाक्षरीने हे आदेश जारी करण्यात आले आहेत.

महापालिकेत प्रति नियुक्तीवर कार्यरत असलेल्या उपायुक्त प्रतिभा पाटील आणि आशा राऊत यांची बदली करून त्यांची नियुक्ती सहाय्यक आयुक्त, नगर परिषद प्रशासन संचालनालय, मुंबई येथे करण्यात आली आहे.

दरम्यान, महापालिकेत तिघा नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत सहायक आयुक्तपदावर कार्यरत असलेल्या विजयकुमार थोरात यांची पुणे महापालिकेत उपायुक्त म्हणून बदली झाली आहे. तसेच पीएमपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा पोतदार यांची नियुक्ती पुणे महापालिकेत सहाय्यक आयुक्तपदी करण्यात आली आहे. याशिवाय, पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रशासन अधिकारी म्हणून काम पाहणाऱ्या शीतल वाकडे यांनाही पुणे महापालिकेत प्रशासन अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

राज्य सरकारकडून महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या व पदस्थापना नुकत्याच जाहीर करण्यात आल्या असून, पुणे महापालिकेतील या बदल्या त्याचाच एक भाग आहेत.

Spread the love

You may have missed