पुणे: विश्रांतवाडीत उघडपणे सुरू मटका व्यवसाय; पोलिस प्रशासनावर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह

b73f888343b207e7f642002e0be9ac77772b25ca.webp

पुणे – विश्रांतवाडी परिसरात मटका व्यवसाय उघडपणे सुरू असल्याची गंभीर चर्चा नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांत रंगली आहे. अतुल देवकर याच्या मार्फत हा धंदा विश्रांतवाडी मासे मार्केटच्या समोर, मंदिर परिसरात, विनोद मेमोरियल हॉस्पिटलसमोर तसेच विश्रांतवाडी स्मशानभूमी भागात जोरात सुरू असल्याचे सांगितले जाते.

नागरिकांच्या मते, एवढ्या उघडपणे चालणाऱ्या धंद्याची माहिती स्थानिक विश्रांतवाडी पोलिस ठाण्यातील अधिकारी व पोलिस प्रशासनाला नसणे अशक्य आहे. मात्र प्रत्यक्षात पोलिस प्रशासनाचे “आशीर्वाद” असल्यामुळेच हा मटका व्यवसाय सुरू राहतो, असा आरोप करण्यात येत आहे.

या बेकायदेशीर धंद्यामुळे परिसरातील तरुण पिढी व्यसनाच्या गर्तेत अडकून उद्ध्वस्त होत आहे, तरीदेखील कारवाई करण्याऐवजी पोलिसांनी मौन बाळगल्याचे चित्र आहे.

सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाला सवाल केला आहे की, “तरुणाई बरबाद झाली तरी चालेल पण धंदा मात्र कायम सुरू राहिला पाहिजे” असा पोलिसांचा उद्देश आहे का?

या सर्व प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत असून, लवकरच ठोस कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला जात आहे.


Spread the love

You may have missed