पुणे: येरवडा ब्रिज जवळ असणारे टीव्हीएस शोरूमला भीषण आग; ६० दुचाकी जळून खाक – व्हिडिओ

0
Pune-Fire-News.jpg

पुणे – बंडगार्डन रस्त्यावरील तीन मजली ताराबाग इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या टीव्हीएस कंपनीच्या शोरूम आणि सर्व्हिस सेंटरला सोमवारी मध्यरात्री आग लागली. या भीषण आगीत इलेक्ट्रिक व पेट्रोल अशा मिळून तब्बल ६० दुचाकी जळून खाक झाल्या.

बघा व्हिडिओ

सौजन्य: न्यूज डोस

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे नायडू, येरवडा व मुख्यालयातील जवान वॉटर टँकरसह घटनास्थळी दाखल झाले. आग मोठ्या प्रमाणावर पसरल्याने प्रचंड धुराचे लोट उठले. धुरामुळे शोरूममध्ये अडकलेल्या एका कर्मचाऱ्याला जवानांनी सुखरूप बाहेर काढले. अग्निशमन दलाच्या तात्काळ कार्यवाहीमुळे मोठा अनर्थ टळला.

सुमारे ३० मिनिटांच्या प्रयत्नांनंतर जवानांनी श्वसन यंत्रांचा वापर करून आग नियंत्रणात आणली. त्यानंतर कुलिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले. आगीत शोरूममधील यंत्रसामुग्री, बॅटरी, संगणक, एसी, टेबल-खुर्च्या, सोफा, महत्त्वाची कागदपत्रे यासह इलेक्ट्रिक वायरिंगचेही मोठे नुकसान झाले.

अग्निशमन विभागाचे वरिष्ठ अधिकारी विजय भिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. घटनास्थळी महावितरणचे कर्मचारी व पोलिस अधिकारीही उपस्थित होते. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.


Spread the love

Leave a Reply