पुणे : वाहतूक आणि गुन्हे शाखेत मोठ्या प्रमाणावर बदल : ४२ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या, आठ निरीक्षकांचे वाहतूक विभागात रोटेशन

0FDE7814-5927-4E39-81E3-6AD753B132A7.jpeg

पुणे | प्रतिनिधी
शहरात वाहतूक शाखेविषयी वारंवार येणाऱ्या तक्रारींची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुणे शहर पोलिस दलात मोठ्या प्रमाणावर बदल केले आहेत. या पार्श्वभूमीवर एकूण ४२ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या असून, त्यात वाहतूक शाखेतील ८ पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे तीन गुन्हे पोलीस निरीक्षकांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून संधी देण्यात आली आहे. तसेच विमानतळ पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह दोन गुन्हे पोलीस निरीक्षकांचीही बदली करण्यात आली आहे.

बदली झालेले काही प्रमुख निरीक्षक आणि त्यांचे नवीन कार्यस्थळ :

राहुलकुमार खिलारे (गुन्हे, भारती विद्यापीठ) – वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भारती विद्यापीठ

अमोल मोरे (गुन्हे, पर्वती) – वरिष्ठ पोलीस निरीक्षक, फुरसुंगी

गोविंद जाधव (गुन्हे, वानवडी) – वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विमानतळ

हर्षवर्धन गाडे – विशेष शाखा

आशालता खापरे – गुन्हे शाखा

मंगळ मोढवे, सावळाराम साळगांवकर – वाहतूक शाखा

संगिता जाधव, विठ्ठल पवार, अश्विनी जगताप – गुन्हे शाखेतील विविध ठिकाणी

विजयकुमार डोके, विश्वजित जगताप, जितेंद्र कदम, रंगराव पवार – गुन्हे शाखेत बदली

सुनिल पंधरकर, अजय संकेश्वरी, सुरेश शिंदे, संतोष सोनवणे, अरुण हजारे – पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयात वाचक पदावर

प्रताप मानकर, नंदकुमार बिडवई – पोलीस उपायुक्त आणि अपर आयुक्तांच्या कार्यालयात


विशेष शाखा, आर्थिक गुन्हे आणि कोर्ट आवारातही बदल

विजय टिकोळे, विजय बाजारे, निलम भगत, राजू अडागळे यांची विशेष शाखेत बदली झाली असून दत्तात्रय करचे, राजू चव्हाण, कुमार घाडगे यांना आर्थिक गुन्हे शाखेत नियुक्त करण्यात आले आहे.

तात्पुरत्या बदल्या आता कायम

यापूर्वी तात्पुरती नियुक्ती मिळालेल्या ९ पोलीस निरीक्षकांची बदली आता कायम करण्यात आली आहे. त्यामध्ये अंजुम बागवान, भाऊसाहेब पाटील, स्मीता वासनिक, प्रशांत अन्नछत्रे यांचा समावेश आहे. आर्थिक गुन्हे शाखेत प्रदीप कसबे, उत्तम नामवाडे, अशोक इप्पर, प्रकाश धेंडे यांच्या बदल्याही कायम करण्यात आल्या आहेत.

नवीन चेहरे पुण्यात दाखल

वर्षा देशमुख (गुन्हे अन्वेषण विभाग) – गुन्हे, कोंढवा

अनिता निकुंभ (ठाणे शहर) – गुन्हे, पर्वती

सविता धनवट – विशेष शाखा


या मोठ्या प्रमाणातील बदल्यांमुळे पुण्यातील पोलिसिंग व्यवस्थेत नवे बदल होण्याची शक्यता असून, नागरिकांच्या तक्रारींना अधिक गतीने आणि परिणामकारकतेने प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Spread the love