पुणे: राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा सप्ताहानिमित्त कोरेगाव पार्कमध्ये जनजागृती मोहीम

IMG-20260108-WA0032.jpg

पुणे : राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने कोरेगाव पार्क वाहतूक विभागाच्या वतीने शुक्रवारी (दि. ८ ) सकाळी ११.३० ते १२.०० या वेळेत मंगलदास चौक येथे विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात ‘यमराज’ या प्रतीकात्मक रूपाच्या माध्यमातून वाहनचालकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जागृती करण्यात आली.

या कार्यक्रमात वाडीयाचे विद्यार्थी सक्रिय सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी “रस्ता सुरक्षा – जीवन सुरक्षा” अशा घोषणा देत उपस्थित वाहनचालकांचे लक्ष वेधले. सिग्नल तोडणारे, हेल्मेट न घालणारे, सीट बेल्ट न लावणारे तसेच वाहन चालवताना मोबाईल फोन वापरणाऱ्या चालकांना यमराजाच्या माध्यमातून नियमांचे उल्लंघन केल्याचे दुष्परिणाम पटवून देण्यात आले.

वाहतूक नियमांचे पालन करणे हे केवळ कायदेशीर बंधन नसून स्वतःच्या व इतरांच्या जीविताच्या सुरक्षेसाठी अत्यंत आवश्यक आहे, असा संदेश फलकांद्वारे देण्यात आला. राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी नियम पाळावेत, सुरक्षित वाहनचालन करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

ही जनजागृती मोहीम सहा. पोलीस निरीक्षक प्रतीक्षा शेंडगे, कोरेगाव पार्क वाहतूक विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

Spread the love

You may have missed