पुणे: आरोग्य अधिकाऱ्याच्या रजेत अनियमितता? वरिष्ठ अधिकाऱ्यांवर संशयाची सुई; मनपा प्रशासनात दुजाभाव? डॉ. पाटील यांना विशेष वागणुकीचा आरोप

Unsettled-GST-Dues-Pune-Municipal-Corporation-Deficit-total-GST-Dues-taxscan-1536x806.jpg

पुणे: पुणे महानगरपालिका प्रशासनाकडून एका विशिष्ट अधिकाऱ्याला झालेल्या अध्ययन रजा व भत्त्याच्या मंजुरीवरून वाद निर्माण झाला आहे. पुण्याचे जेष्ठ नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते श्री  रमेश विष्णु खामकर यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महापालिका आयुक्त व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर केलेल्या तक्रारीत गंभीर आरोप केले आहेत.

तक्रारीनुसार, पुणे मनपाच्या आरोग्य विभागाने डॉ. प्रल्हाद हेमराज पाटील यांना, असाधारण रजा मंजूर झालेली असताना, मागील तारखेपासून प्रभावी ठरणारी अध्ययन रजा आणि अभ्यास भत्ता मंजूर केला आहे. संबंधित अधिकारी पुणे मनपामध्ये आवश्यक ५ वर्षांची सेवा पूर्ण करत नसताना त्यांना अध्ययन रजा कशी मंजूर करण्यात आली? असा सवाल या तक्रारीत उपस्थित करण्यात आला आहे.

तक्रारदार खामकर यांच्या म्हणण्यानुसार, अध्ययन रजा मंजूर करताना प्रशासनाने नियमांची पायमल्ली केली असून, डॉ. पाटील यांना विद्यावेतन मिळत असताना व अभ्यासक्रम सक्तीचा नसताना देखील भत्त्याची मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे पुणे मनपाचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

तसेच, या निर्णयामुळे इतर अधिकारीही अशाच प्रकारच्या मागण्या करू शकतात, असा इशाराही तक्रारीत देण्यात आला आहे. सामान्य प्रशासन विभाग आणि आरोग्य विभाग या प्रकरणाला प्राधान्य देत असून, अनेक पदोन्नती व सेवा विषयक प्रकरणे वर्षानुवर्षे प्रलंबित असताना डॉ. पाटील यांच्या फाईलवर वेगाने कार्यवाही होत असल्याने शंका उपस्थित होत आहे.

तक्रारदार खामकर महापालिका आयुक्तांकडे मागणी केली आहे की, संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी नियमबाह्य पद्धतीने निर्णय घेतला असल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी.


Spread the love

You may have missed