पुणे: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाणेर, चतुः शृंगी, येरवडा, चंदननगर, खराडी, वाघाली, लोणीकंद परिसरातील २९ गुंड तडीपार; जाणून घ्या त्या गुंडांची नावे

0
0b9f4324-5863-4de4-bfa9-9c665fe481c7_1755689725570.jpg

पुणे – गणेशोत्सवाच्या काळात शहरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पुणे पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत. याच अनुषंगाने शहरातील २९ सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे.

परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त सोमय मुंढे यांनी बाणेर, चतुःशृंगी, येरवडा, चंदननगर, खराडी, वाघोली आणि लोणीकंद परिसरातील तब्बल २६ गुन्हेगारांना तडीपार करण्याचे आदेश दिले. तसेच, परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी कात्रज भागातील ३ सराईतांना दोन वर्षांसाठी शहर आणि जिल्ह्याबाहेर हद्दपार केले आहे.

शहरातील १०० हून अधिक सराईतांवर पोलिसांची विशेष नजर ठेवण्यात आली असून त्यांच्याविरुद्धही लवकरच प्रतिबंधक कारवाई होणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. तडीपार केलेले गुंड पुन्हा शहरात परतल्यास तात्काळ जवळच्या पोलिस ठाण्यात माहिती देण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

परिमंडळ चारमधून तडीपार झालेले प्रमुख गुंड
शिवाजी लक्ष्मण रामावत (पाषाण), सचिन अशोक रणपिसे (येरवडा), सूरज ऊर्फ किल्या बाणेकर (येरवडा), सलमान चाँदबाशा शेख (वाघोली), सुंदर ऊर्फ कुबड्या मेत्रोळ (येरवडा), आशा राठोड (येरवडा), शांताबाई राठोड (येरवडा), नीता नगरकर (वडगावशेरी), गणेश जाधव (बाणेर), प्रेम ससाणे (येरवडा), सोनाबाई राठोड (येरवडा), मुन्नीबाई राठोड (येरवडा), गणेश वाघमारे (चंदननगर), नीलेश वाघमारे (खराडी), मोहन जाधव (गोखलेनगर), हबीब इराणी (शिवाजीनगर) आदींचा समावेश आहे.

कात्रज परिसरातून तडीपार झालेले गुंड
अभय ऊर्फ सोन्या निसर्गंध (आंबेगाव खुर्द), विनोद धरतीमगर (आंबेगाव बुद्रूक) आणि प्रथमेश ऊर्फ अभय कुडले (दत्तनगर, आंबेगाव बुद्रूक) या तिघांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले.

गणेशोत्सवात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये आणि नागरिकांनी शांततेत सणाचा आनंद घ्यावा यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.


Spread the love

Leave a Reply