पुणे: हकीम अजमल खान उर्दू माध्यमिक शाळेचा १० वीचा निकाल १०० टक्के

येरवडा, प्रतिनिधी – येरवडा येथील स्वातंत्र्य सेनानी हकीम अजमल खान उर्दू माध्यमिक शाळेने यंदाच्या इ. १० वीच्या परीक्षेत शतप्रतिशत निकालाची घौडदौड कायम राखली आहे. या यशस्वी निकालामुळे शाळेचे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकवृंदात आनंदाचे वातावरण आहे.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सफिया शेख, असिस्टंट टिचर सौ. शबाना अरब, करार शिक्षिका सौ. रिजवाना अत्तार, असिस्टंट टिचर सौ. रुही कुमठे, असि. टिचर शकील सय्यद आणि खालिद सर यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांच्या मेहनतीबरोबरच शिक्षकांचे सातत्यपूर्ण प्रयत्न आणि पालकांचे सहकार्य यामुळे हा १००% निकाल शक्य झाल्याचे मुख्याध्यापिका शेख यांनी सांगितले.
या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेतील सर्व उत्तीर्ण विद्यार्थी आणि शिक्षक वृंदाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ‘महाराष्ट्र माझा न्यूज’ तर्फे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.